युरिया संकटावर फ्रेंच स्टार्टअपचा अनोखा तोडगा; मानवी मूत्रापासून बनवले सेंद्रिय खत
आंतरराष्ट्रीय:जागतिक स्तरावर युरियाचा तुटवडा आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी हवालदिल झाले असताना, फ्रान्समधील एका स्टार्टअप कंपनीने एक क्रांतिकारी प्रयोग यशस्वी केला आहे. ‘Toopi Organics’ या फ्रेंच स्टार्टअप कंपनीने चक्क मानवी मूत्रापासून पिकांसाठी उपयुक्त खत तयार केले आहे.
वाढत्या युरिया संकटाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम जगभरातील कृषी क्षेत्रासाठी एक आशेचा किरण ठरत आहे.
ही कंपनी शाळा आणि विविध सार्वजनिक उत्सवांमधून मानवी मूत्र गोळा करते.
गोळा केलेल्या मूत्रावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर जीवाणूयुक्त खतामध्ये केले जाते.
हे खत पिकांच्या नैसर्गिक वाढीसाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
युरियाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांचा ओढा आता या पर्यायी खताकडे वाढू लागला आहे. परिणामी, या स्टार्टअपच्या विक्रीत तब्बल २५% वाढ झाली आहे. पारंपारिक खतांना हा एक पर्यावरणपूरक आणि स्वस्त पर्याय म्हणून समोर येत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी, ९८२२५४८४२९








