पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ: महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; संशयित पोलिसांच्या ताब्यात:-


पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ: महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; संशयित पोलिसांच्या ताब्यात:-

पुणे. पिंपरी -चिंचवड :दि. 22 मे :-पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे एका संशयित तरुणाला चिखली परिसरातून ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान हेल्पलाईन’वर थेट फोन करून ही धमकी देण्यात आली होती, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचे लोकेशन ट्रेस करून आशिष जमदाडे-पाटील (रा. चिखली, मूळ रा. अहिल्यानगर/अहमदनगर) या तरुणाला ताब्यात घेतले. आशिष हा भोसरी एमआयडीसीमधील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक (Security Guard) म्हणून काम करतो.

विशेष म्हणजे, हा तरुण महापौरांसाठी पूर्णपणे अनोळखी नव्हता. काही महिन्यांपूर्वी क्रीडा क्षेत्रातील काही कामानिमित्त त्याने महापौरांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेतली होती आणि एका भेटीत महापौरांना पुस्तकही भेट दिले होते.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!