वुई टुगेदर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम “सावली निवारा” वृद्धाश्रमात कपडे, औषधे व प्राथमिक उपचार साहित्याचे वाटप


वुई टुगेदर फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
“सावली निवारा” वृद्धाश्रमात कपडे, औषधे व प्राथमिक उपचार साहित्याचे वाटप

पिंपरी | 26 मे 2026
सामाजिक बांधिलकी जपत वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने पिंपरी येथील “सावली निवारा” वृद्धाश्रमात वृद्ध महिला-पुरुषांसाठी कपडे, प्राथमिक उपचार पेट्या, अत्यावश्यक औषधे तसेच खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
“सावली निवारा” वृद्धाश्रमात शहरातील विविध भागांतील निराधार आणि गरजू वृद्धांचे निशुल्क संगोपन केले जाते. आश्रमाला सातत्याने विविध आवश्यक वस्तू व आरोग्यसंबंधित मदतीची गरज भासत असल्याने वुई टुगेदर फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत वृद्धांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित सदस्यांनी वृद्धांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच अन्नवाटप आणि प्राथमिक आरोग्य तपासणीही करण्यात आली. या उपक्रमामुळे आश्रमातील वृद्धांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे म्हणाले, “या आश्रमातील वृद्धांचे आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. त्यांच्या सेवेसाठी वुई टुगेदर फाउंडेशन सदैव तत्पर राहील.” तसेच भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात मधुकर बच्चे (अध्यक्ष), रवींद्र काळे (उपाध्यक्ष), जयंत कुलकर्णी (सचिव), मंगला डोळे-सपकाळे (सहसचिव), दिलीप चक्रे (खजिनदार), कुशाल दुसाने (सल्लागार), माजी अध्यक्ष सलीम सय्यद, विलास गटने, रंगाराव कुकाला, रोहिणी बच्चे, सुषमा कोरे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमामुळे आश्रमातील वृद्धांना तातडीच्या गरजेच्या वस्तू व औषधांचा पुरवठा झाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळाला आहे. वुई टुगेदर फाउंडेशन पुढील काळातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
📞 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!