बीडमध्ये हुंड्यासाठी PSI नवरदेवाचा ऐनवेळी लग्नाला नकार; गुन्हा दाखल


बीडमध्ये हुंड्यासाठी PSI नवरदेवाचा ऐनवेळी लग्नाला नकार; गुन्हा दाखल

​बीड: बीड जिल्ह्यामध्ये लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली असताना एका पीएसआय (PSI) नवरदेवाने हुंड्यासाठी ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवन निंबाळकर असे या पीएसआयचे नाव असून, त्याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीच्या कुटुंबाला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी पीएसआय पवन निंबाळकर याने २० तोळे सोने आणि १० लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या कुटुंबीयांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्या मागणीवर ठाम राहिला आणि त्याने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
​याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात आरोपी पीएसआय विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

​पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!