बार्शीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी 🚩
बार्शी : भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी येथे ‘ब्राह्मण महासंघ’ व ‘हिंदू महासभा’ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार तसेच ब्राह्मण महासंघ बार्शीचे अध्यक्ष दिनकर सापनाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि हिंदुत्ववादी विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








