दुर्गाडी किल्ल्यावर ‘घंटानाद’ आंदोलन; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव


दुर्गाडी किल्ल्यावर ‘घंटानाद’ आंदोलन; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव

कल्याण :ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रविवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. बकरी ईद निमित्त नमाज पठण सुरू असताना हिंदूंना मंदिर प्रवेशास बंदी घालण्यात आल्याचा आरोप करत शिंदे गटाचे शिवसैनिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी किल्ला परिसरात जोरदार ‘घंटानाद’ आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी मंदिरात हिंदूंना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी आंदोलन केले जाते. यंदाही आंदोलकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासनाने किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना नियंत्रित केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सध्या परिसरात शांतता असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. नं. : 9822548429


49
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!