मुदतवाढ नाही: १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा–टॅक्सी चालकांना मराठी शिकणे बंधनकारक; परिवहन मंत्र्यांचा इशारा


मुदतवाढ नाही: १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा–टॅक्सी चालकांना मराठी शिकणे बंधनकारक; परिवहन मंत्र्यांचा इशारा

मुंबई — राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आता व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेतील अडचणी दूर करणे आणि सार्वजनिक सेवा सुधारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठीचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. ते म्हणाले, “चालकांना प्रवाशांशी सोपे व शिष्ट संवाद करता यावा, यासाठी मराठीची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे.” प्रशिक्षण ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष केंद्रांवर उपलब्ध असेल, असे ते म्हणाले.
मुदतवाढ नाकारली
परिवहन विभागाने स्पष्ट केले की, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. दिलेल्या मुदतीत प्रशिक्षण पूर्ण न केलेल्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!