पतंजलीशी संबंधित औषधांचा 73 लाखांचा साठा जप्त; सात जिल्ह्यांत एफडीएची धडक कारवाई


पतंजलीशी संबंधित औषधांचा 73 लाखांचा साठा जप्त; सात जिल्ह्यांत एफडीएची धडक कारवाई

मुंबई : राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भ्रामक आरोग्यविषयक दावे करणाऱ्या औषधांवर मोठी कारवाई करत सात जिल्ह्यांमध्ये छापेमारी मोहीम राबवली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत पतंजलीशी संबंधित औषधांचा सुमारे 73 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आरोग्यविषयक दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि औषधांच्या विक्रीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश एफडीएने या मोहिमेतून दिला आहे.
एफडीएच्या पथकांनी विविध ठिकाणी तपासणी करून संबंधित औषधांचा साठा जप्त केला असून, या उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि त्यांच्या विक्रीसंदर्भातील कायदेशीर बाबींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच संबंधित उत्पादक आणि वितरकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाईची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
या धडक कारवाईमुळे औषध व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली असून, राज्यभरातील औषध विक्रेते आणि उत्पादकांचे लक्ष आता एफडीएच्या पुढील पावलांकडे लागले आहे

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!