गुजरातमध्ये भीषण बस अपघात; दोन बसेसची समोरासमोर धडक, ६ जणांचा मृत्यू


गुजरातमध्ये भीषण बस अपघात; दोन बसेसची समोरासमोर धडक, ६ जणांचा मृत्यू

सुरत, प्रतिनिधी : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मंगळवारी (२ जून) एक भीषण बस अपघात घडला. महाराष्ट्र नोंदणी क्रमांक असलेल्या दोन खासगी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा अपघात सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ घडला. समोरासमोर आलेल्या दोन बसेसची धडक इतकी भीषण होती की एका बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला, तर दुसरी बस रस्त्यावर उलटली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, अपघातानंतर उलटलेल्या बसला अचानक आग लागल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!