अडीच महिन्यांनी जमिनीतून बाहेर काढला 12 वर्षीय मुलाचा सांगाडा; वडिलांचा खुनाचा संशय


अडीच महिन्यांनी जमिनीतून बाहेर काढला 12 वर्षीय मुलाचा सांगाडा; वडिलांचा खुनाचा संशय

जळगाव, प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील रेल गावात 12 वर्षीय गणेश नवल पाटील याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. 15 मार्च रोजी मृत्यू झालेल्या गणेशचा मृतदेह वडिलांच्या मागणीनुसार अडीच महिन्यांनंतर जमिनीतून बाहेर काढण्यात आला. मात्र, तोपर्यंत मृतदेहाचे पूर्णपणे विघटन होऊन केवळ सांगाडाच शिल्लक राहिला होता.

गणेशच्या वडिलांनी मुलाला क्रिकेट बॅटने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलाचा सांगाडा पाहून वडिलांनी घटनास्थळीच हंबरडा फोडला.

दरम्यान, शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!