जेजुरीत भाविकांची अडवणूक पडणार महाग; भंडारा खरेदीची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार


जेजुरीत भाविकांची अडवणूक पडणार महाग; भंडारा खरेदीची सक्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार

जेजुरी, प्रतिनिधी : जेजुरी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विशिष्ट दुकानातूनच भंडारा किंवा पूजेचे साहित्य खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशी सक्ती केल्यास संबंधितांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिला आहे.

जेजुरी गड परिसरात पार्किंग, भंडारा विक्री आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीवरून वारंवार वाद निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. काही ठिकाणी भाविकांना विशिष्ट दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचेही निदर्शनास आले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

या निर्णयानंतर भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही दुकानातून भंडारा व पूजेचे साहित्य खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक, जबरदस्ती किंवा आर्थिक शोषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे जेजुरीत येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, सर्वसामान्य भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!