पुणे विषारी दारू प्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित; मृतांचा आकडा २४ वर


पुणे विषारी दारू प्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित; मृतांचा आकडा २४ वर

पुणे: पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू दुर्घटनेत मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून, या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी थेट संपर्क असल्याचा ठपका ठेवत उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे अधिकारी अजित काळे आणि सुमित वाघ यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी ही कारवाई केली असून, संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आले आहे. यापूर्वीही या प्रकरणात काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. एसआयटीच्या तपासातून या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!