डीके शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली


डीके शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

बंगळुरू :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांनी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेत कर्नाटकच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच राज्यभर प्रचाराची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली होती.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डीके शिवकुमार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून कर्नाटकातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी,
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!