पाकिस्तानी डॉनच्या संपर्काप्रकरणी श्रीरामपूरचे चौघे एटीएसच्या चौकशीच्या फेऱ्यात?.


पाकिस्तानी डॉनच्या संपर्काप्रकरणी श्रीरामपूरचे चौघे एटीएसच्या चौकशीच्या फेऱ्यात?

श्रीरामपूर, प्रतिनिधी :  श्रीरामपूर शहरात बुधवारी दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छापेमारी करून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित चौघांचा पाकिस्तानमधील कथित गँगस्टर शेहेजाद भट्टी याच्याशी संपर्क असल्याच्या संशयावरून एटीएसने त्यांची कसून चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित गँगस्टरच्या संपर्कात आले होते. या पार्श्वभूमीवर एटीएसने त्यांच्या हालचाली व संपर्कांची माहिती घेण्यासाठी चौकशी केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीनंतर चौघांना तात्पुरते सोडून देण्यात आले आहे. मात्र, तपास अद्याप सुरू असून आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

या प्रकरणाबाबत एटीएसकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसून, चौकशी सुरू असल्याने संबंधित यंत्रणा अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाकडे श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!