​कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: ऐनवेळी अर्ज मागे घेणाऱ्या बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी!


​कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: ऐनवेळी अर्ज मागे घेणाऱ्या बाळ मानेंची ठाकरे गटातून हकालपट्टी!

​कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीतून एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. निवडणूक अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेतला. या धक्कादायक निर्णयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्यावर तातडीने कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे.
​पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची अधिकृत माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
​मिळालेल्या माहितीनुसार, भाजप मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जात बाळ माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. बाळ माने यांच्या या नाट्यमय माघारीमुळे आता महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या राजकीय घडामोडीमुळे कोकणच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!