प्रेयसीला आयफोन भेट देण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी चोरले साडेसहा लाखांचे नळ; नागपुरातील धक्कादायक प्रकार


प्रेयसीसाठी आयफोन देण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी चोरले साडेसहा लाखांचे महागडे नळ

नागपूर: प्रेयसीला महागडा आयफोन भेट देण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी शहरातील एका गोदामातून साडेसहा लाख रुपयांच्या आलिशान डिझायनर नळांची चोरी केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून अवघ्या १२ तासांत चोरीचा पूर्ण छडा लावला आहे.
माहितीप्राप्तीनुसार, गुन्ह्यातील दोन्ही अल्पवयीन मुलांनी गोदामातून नळे चोरी केली. चोरी नंतर त्यांनी ऑनलाइन किंवा बाजाऱ्यात न मिळवता साडेसहा लाखांचा माल स्थानिक दुकानदाराला अवघ्या २० हजार रुपयांना विकले. त्या पैशातून दोन मुलांना आपापल्या प्रेयसींना महागडा आयफोन घेण्याचा मानस होता, असे तपासात समोर आले आहे.
पोलीसांनी तातडीने चौकशी सुरू केली आणि चोरीचे सर्व नळ जप्त केले. दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चोरीचे नळ विकत घेतल्याचा आरोप लागून इरफान अली नावाच्या स्थानिक दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
लोक

पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!