बार्शीत क्रिकेट पिचवर रोलर अंगावरून गेल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू


बार्शीत क्रिकेट पिचवर रोलर अंगावरून गेल्याने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिवशक्ती मैदानावर क्रिकेट समर कॅम्पदरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात १५ वर्षीय आरव ऊर्फ वीरेन चौधरी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पिच रोलर अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या आरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी समर कॅम्पमधील काही मुले खेळपट्टीवरील पिच रोलर ओढण्याचे काम करत होती. यावेळी रोलर ओढताना आरवचा अचानक तोल गेला आणि वजनी रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत अंगावरून गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर आरवला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बार्शी परिसरात हळहळ व्यक्त होत असून क्रीडा क्षेत्रातही शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी आरवच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. अपघात घडला त्यावेळी मैदानावर कोणताही अधिकृत प्रशिक्षक उपस्थित नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे कॅम्पच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या घटनेची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघाताला नेमके कोण जबाबदार आहे, तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास केला जात आहे.
.
पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!