घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.


घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने “घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले. शहरातील स्वच्छता, कचरा वर्गीकरण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ मधील तरतुदी, नागरिकांची जबाबदारी, कचऱ्याचे स्रोतावरच वर्गीकरण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, संजय कुलकर्णी,उप आयुक्त अण्णा बोदडे. आरोग्य अधिकारी डॉ. ठेगळ आणि विक्रांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी तसेच नागरिकांना ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करण्याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

या कार्यशाळेमुळे नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, स्वच्छ व हरित पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!