नेरूळमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
नेरूळ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सरदार वल्लभभाई पटेल उद्यान, सेक्टर-९, नेरूळ, नवी मुंबई येथे ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ तसेच महाराष्ट्र वरिष्ठ नागरिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका सौ. मीरा पाटील, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. दि. ना. चापके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिक सभासदांच्या सहभागातून विविध पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे, माजी अध्यक्ष श्री. अरविंद वाळवेकर, सचिव श्री. अजय माढेकर, कोषाध्यक्ष श्री. दीपक दिघे, डॉ. डफळ, डॉ. जे. अंकुशराव यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळचे कार्यकारी अध्यक्ष तथा रुग्णसेवा प्रमुख श्री. रणजित दीक्षित यांनी पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्तम पद्धतीने केले.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून पृथ्वीचे वाढते तापमान, बदलते हवामान आणि लहरी निसर्ग याबाबत चिंता व्यक्त केली. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची आवश्यकता अधोरेखित करताना त्यांनी नवी मुंबईसह इतर ठिकाणी विकासकामे, पुनर्विकास प्रकल्प आणि रस्ते बांधकामांमुळे शास्त्रीय व नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी “झाडे लावा, झाडे जपा” असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
अत्यंत उत्साही वातावरणात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन ज्येष्ठ नागरिकांनी झाडे लावून साजरा केला. प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ, नवी मुंबई श्री. भालचंद्र माने याच्या तर्फे ह्या कार्यकमाची माहिती dena
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






