कोथरूडमध्ये उद्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन; आनंद दवे मांडणार विचार
पुणे:स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर कोथरूड भागात एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समर्थ प्रभात शाखा आणि स्वामी विवेकानंद नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानात मुख्य वक्ते म्हणून हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत आनंद दवे उपस्थित राहणार असून, ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाचा सविस्तर तपशील:
विषय: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व
वक्ते: आनंद दवे (हिंदू महासभा)
दिनांक: रविवार, ७ जून २०२६
वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता
स्थान: त्रिकोणी मैदान, वसुधा इशिता (इताशा) सोसायटी, वेद भवन जवळ, कोथरूड, पुणे.
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी किंवा समन्वयासाठी खालील संयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
सौ. श्वेता कुलकर्णी: ७५८८३२०५७१
श्री. विश्वास कुलकर्णी: ९७६९१५०२७५
सावरकरांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका समजून घेण्यासाठी कोथरूड आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






