मुंबईत वरळीतल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, तरुणी अत्यंत गंभीर; ड्रग्जच्या संशयाने खळबळ


मुंबईत वरळीतल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, तरुणी अत्यंत गंभीर; ड्रग्जच्या संशयाने खळबळ

​मुंबई:मुंबईतील वरळी परिसर एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. वरळी येथे आयोजित एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला असून, एक तरुणी अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील अशा मोठ्या पार्ट्या आणि कॉन्सर्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
​या घटनेनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात सध्या ‘रेव्ह पार्ट्यांचे’ आणि ड्रग्जचे प्रमाण सातत्याने वाढत चालले असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कॉन्सर्टमधील या घटनेमागे ड्रग्जचा ओव्हरडोज असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
​दुसरीकडे, गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ड्रग्जविरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, या काळ्या धंद्याचे मूळ पाळमुळे खणून काढणार असल्याचा इशारा गृहविभागाकडून देण्यात आला आहे. या कॉन्सर्टमध्ये नेमके काय घडले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
​खरात प्रकरणी शिर्डीतील हॉटेल मालकांची चौकशी सुरू
​दरम्यान, दुसऱ्या एका मोठ्या प्रकरणात वादग्रस्त खरात प्रकरणाचा तपास आता शिर्डीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी शिर्डीतील काही हॉटेल मालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या संपर्कात कोण होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!