मान्सून पूर्व तयारीला वेग, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतर करण्याचे नियोजन :-


मान्सून पूर्व तयारीला वेग, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतर करण्याचे नियोजन :-

जि. सांगली :दि 9 जून :-सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत महापौर धीरज सूर्यवंशी व आयुक्त संजीता महापात्र यांच्या उपस्थितीत पूर व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. धरणांतील पाणीसाठा, हवामान विभाग व पाटबंधारे विभागाशी २४ तास समन्वय ठेवून पूरस्थितीपूर्वीच सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘आपत्ती मित्र’ ॲप व ब्रॉडकास्ट मेसेजद्वारे नागरिकांना तत्काळ इशारे दिले जाणार असून, नदीची पातळी वाढताच सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच निवारा केंद्रांतील वीज, पाणी व स्वच्छतेची व्यवस्था, नालेसफाई, अतिक्रमण हटविणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!