​तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट: १९ बंडखोर खासदारांची यादी समोर, ममता बॅनर्जींची चिंता वाढली


​तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट: १९ बंडखोर खासदारांची यादी समोर, ममता बॅनर्जींची चिंता वाढली

​पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर आता तृणमूल काँग्रेस पक्षात सर्वात मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. आमदारांनंतर आता थेट खासदारांनीच पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांची एक यादी आता समोर आली असून, यामध्ये एकूण १९ खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्यासारख्या बड्या चेहऱ्यांची नावे असल्याने पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासमोरील अडचणी कमालीच्या वाढल्या आहेत.
​लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे एकूण २८ खासदार आहेत. त्यापैकी १९ खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी केल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भातील स्वाक्षरी केलेली यादी लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बंडखोर खासदारांच्या यादीत काकोली घोष (बारासात), जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार), खलीलुर रहमान (जंगीपूर), युसूफ पठाण (बहारमपूर), अबू ताहीर खान (मुर्शिदाबाद), पार्थ भौमिक (बराकपूर), बापी हलदर (मथुरापूर), सायोनी घोष (जादवपूर), माला रॉय (कोलकाता दक्षिण), मिताली बाग, दिपाली अधिकारी, कालीपद सोरेन, जून मालिया, अरुप चक्रवर्ती, डॉ. शर्मिका सरकार, शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), असित कुमार मल (बोलपूर), शताब्दी रॉय आणि रचना बॅनर्जी (हुगली) यांचा समावेश आहे.
​पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू झालेला हा संघर्ष आता पक्षाचे अस्तित्व आणि नेतृत्वाच्या लढाईत बदलला आहे. एकीकडे ममता बॅनर्जी यांचा गट दिल्लीत राजकीय पर्याय शोधण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे बंडखोर गट संघटना, बहुसंख्य आमदार आणि खासदारांच्या जोरावर स्वतःलाच खरी तृणमूल काँग्रेस म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. २८ वर्षांपूर्वी स्थापन झालेली तृणमूल काँग्रेस आजवरच्या सर्वात मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!