पुणेकरांसाठी मोठी बातमी: १५ जूनपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, वॉशिंग सेंटर आणि स्विमिंग पूल राहणार बंद
पुणे शहरात पाणी संकट गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे. येत्या १५ जूनपासून संपूर्ण पुणे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठा नियोजनबद्ध पद्धतीने वापरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
या नव्या नियमांनुसार शहरात पाणी वापरावर मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत. शहरातील सर्व वाहने धुण्याची वॉशिंग सेंटर्स आणि स्विमिंग पूल पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.
या निर्णयाबाबतचे अधिकृत परिपत्रक महानगरपालिकेकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे. पावसाचे आगमन लांबल्याने किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने हा पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासूनच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







