नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विक्रम; नेहरूंना मागे टाकत ठरले देशातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान


नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विक्रम; नेहरूंना मागे टाकत ठरले देशातील सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला आहे. १० जून २०२६ रोजी त्यांनी सलग ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून असलेला विक्रम मोडीत काढला.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी प्रथमच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत ते सलग तिसऱ्या कार्यकाळात देशाचे नेतृत्व करत आहेत. या सलग कार्यकाळामुळे त्यांनी ४,३९९ दिवसांचा टप्पा गाठला असून हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील महत्त्वाचा विक्रम मानला जात आहे.
या यादीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ४,०७७ दिवस सलग पंतप्रधानपदावर राहून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त देश-विदेशातील अनेक नेते, मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!