नेरुळमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचा कथित अपमान; ख्रिश्चन नर्सविरोधात गुन्हा दाखल


नेरुळमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचा कथित अपमान; ख्रिश्चन नर्सविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई :नवी मुंबईतील नेरुळ परिसरात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींचा आणि देव्हाऱ्याचा कथित अपमान केल्याप्रकरणी एका ख्रिश्चन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हर्षला पाटील या नेरुळ येथील एका हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असून त्या आपल्या खोलीत श्री गणेश आणि राधा-कृष्ण यांच्या मूर्तींची नियमित पूजा करत होत्या. मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्यासोबत राहण्यासाठी आलेल्या संबंधित नर्सने देव्हाऱ्याबाबत आक्षेप घेत वारंवार वाद घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ५ जून रोजी हर्षला पाटील कामावरून परत आल्यानंतर त्यांना देव्हारा चपला ठेवण्याच्या जागेजवळ हलविलेला आढळला. तसेच देवतांच्या मूर्ती विस्कटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित नर्सने धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने ६ जून रोजी संबंधित नर्सला निलंबित केल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यानंतरही तिने पुन्हा हॉस्टेलमध्ये येऊन देव्हाऱ्याचा अपमान केल्याचा आणि तक्रारदाराला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९८ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप आरोपी दोषी ठरलेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!