स्थानिक प्राधिकारी निवडणुकानच्या अनुषंगाने विशेष दक्षता घेण्याचे आदेश :-
सांगली : सांगली-सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून, मतदान प्रक्रियेदरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. मतदान केंद्रांवर मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास प्रतिबंध, मतदारांना वैध-अवैध मतदानाबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक सूचना फलक लावण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.
सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. प्रशासनाने ही निवडणूक शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










