पालखीला स्पर्श केल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


पालखीला स्पर्श केल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

शेड्याळ (ता. जत) : येथील जत्रोत्सवादरम्यान पालखीला स्पर्श केल्याच्या कारणावरून एका दलित तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अ‍ॅट्रॉसिटी) नवीन भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मडाप्पा रामू हावगोंडी, शामराव हनुमंत गुगवाड आणि गणेश श्रीकांत नरूटे (सर्व रा. शेड्याळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी रखमाजी रामचंद्र केंगार (वय ५४, रा. शेड्याळ) यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शेड्याळ येथील मडसिद्ध मंदिराच्या यात्रेत रखमाजी केंगार हे फिर्यादी राहुल उत्तम मलकटी याच्यासोबत पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. राहुल मलकती देवाच्या पालखीपुढे नतमस्तक होत असताना, त्याने पालखीला हात लावल्याचा राग संशयितांना आला. यावरून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

राग विकोपाला गेल्यानंतर संशयितांनी राहुल मलकती याला जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली.तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर,एका संशयिताने ढोलकीच्या काठीने राहुलच्या पाठीवर आणि छातीवर जबर प्रहार करून त्याला जखमी केले. या घटनेनंतर संशयितांनी फिर्यादी रखमाजी केंगार यांच्या घराबाहेर जाऊन पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.केंगार यांच्या फिर्यादीवरून जत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून,या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!