हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात:-


हतनूर टोलनाक्यावर लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात:-

जि. नाशिक, ता.हतनूर:दि. 18 जून :-सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर टोलनाक्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मंगळवारी (१६ जून) धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. एका कारमधून वाहतूक केला जाणारा तब्बल १ लाख २१ हजार २४० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असून, कार, रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण ५ लाख ८३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने हतनूर टोलनाक्यावर सापळा रचला.

दरम्यान, संशयास्पद हालचाल करणारी एमएच-०५ बीएल ११२५ क्रमांकाची कार अडवून तिची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यानंतर पथकाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे १ लाख २१ हजार २४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, १ लाख रुपयांची रोख रक्कम, एक कार आणि दोन मोबाईल फोनचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ५ लाख ८३ हजार २४० रुपये इतकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याप्रकरणी दीपक कांताराम मोहिते (रा. टापरगाव, ता. कन्नड) आणि नारायण दुर्वास राऊत (रा. वडगाव, पो. बोडखा, ह.मु. बोरगाव, ता. खुलताबाद) या दोघांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबुराव मुंडे करीत आहेत.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!