बंद घरावर चोरट्याचा डल्ला,शिक्षिकेच्या घरातून लाखोंचा एवज लंपास :-


बंद घरावर चोरट्याचा डल्ला,शिक्षिकेच्या घरातून लाखोंचा एवज लंपास :-

जि. सांगली:दि. 19 जून :-सांगली : शहरातील बालाजी नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील रहिवासी व शिक्षिका पुनम सुभाष देसाई यांचे घर १६ जून रोजी रात्री साडेदहा ते १७ जून रोजी सकाळी आठ या कालावधीत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

यानंतर घरातील कपाट फोडून चोरट्याने चांदीचे ताट, ग्लास, दोन वाट्या, गणपती व लक्ष्मीची मूर्ती, चांदीचे दोन हार, फुलपात्र आदींसह सुमारे एक किलो चांदीच्या वस्तू, तसेच अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचे टॉप्स असा मिळून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

१७ जून रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुनम देसाई यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!