खटाव तालुक्यात अवैध गुटखा, दारू व मटका व्यवसायाला ऊत; कारवाईची मागणी:-


खटाव तालुक्यात अवैध गुटखा, दारू व मटका व्यवसायाला ऊत; कारवाईची मागणी:-

जि. सातारा, ता. खटाव:दि. 20 जून :-खटाव तालुक्यात अवैधरित्या गुटखा, पान मसाला, दारू विक्री तसेच मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पानटपऱ्यांवर खुलेआम विमल गुटखा, पान मसाले आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याशिवाय बेकायदेशीर दारू विक्री आणि मटका व्यवसायही प्रत्येक गावात सुरू असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अवैध धंद्यांना कोणाचे अभय आहे? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तालुक्यात हप्त्यांचे प्रमाण वाढल्याचीही चर्चा असून संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील युवकांमध्ये वाढते व्यसन, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सामाजिक वातावरण बिघडण्यास हे अवैध व्यवसाय कारणीभूत ठरत असल्याने शासनाने तात्काळ कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!