अहिल्यानगर येथे मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन:-


अहिल्यानगर येथे मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन:-

जि. अहिल्यनगर:दि. 20 जून :-अंबेश्वर हॉस्पिटल, डॉ. प्रियांका पाटील तसेच स्वस्तिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी मोफत त्वचारोग तपासणी शिबिर व अत्यल्प दरात त्वचेवरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत अंबेश्वर हॉस्पिटल, अंबेश्वर मेडिकल शेजारी, चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. शिबिरामध्ये त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका पाटील (एमबीबीएस, एमडी डर्माटोलॉजी, व्हेनेरियोलॉजी अँड लेप्रसी, एएएएफपी) या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात पिंपल्स, वांग, काळे डाग, त्वचेवरील काळेपणा, कोंडा, टक्कल पडणे, केस गळणे, बुरशीजन्य संसर्ग, अॅलर्जी, कोड, मस्से, गाठी, तोंड येणे, सोरायसिस, इसब तसेच खाज यांसारख्या विविध त्वचारोगांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत.

याशिवाय त्वचेवरील विविध शस्त्रक्रिया व उपचारांवर 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी 9673066646 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिराचे आयोजन डॉ. कुलदीप कदम, रविराज पवार (अंबेश्वर मेडिकल) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!