तुळजापूरात ब्राह्मण महासंघाची दमदार बैठक; नव्या नियुक्त्यांनी संघटनाला नवी दिशा, प्रवीण शिरसीकर यांची विश्वस्तपदी निवड


*तुळजापूरात ब्राह्मण महासंघाची दमदार बैठक; नव्या नियुक्त्यांनी संघटनाला नवी दिशा, प्रवीण शिरसीकर यांची विश्वस्तपदी निवड*

तुळजापूर, दि. २१ जून २०२६ :
ब्राह्मण महासंघाची प्रदेश कार्यकारिणी बैठक प.पू. गुळवणी महाराज आश्रम, तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर भगवान श्री परशुराम, श्री तुळजाभवानी माता आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
बैठकीचे प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शिरसीकर यांनी केले.
यावेळी ब्राह्मण महासंघ तुळजापूरचे अध्यक्ष अजित नाईक यांच्या मातोश्री कै. सुमनताई चंद्रकांत नाईक तसेच ब्राह्मण महासंघ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलास शाळू यांचे बंधू कै. राजेश बाळासाहेब शाळू यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदजी दवे होते. व्यासपीठावर विश्वस्त श्वेता कुलकर्णी, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शिरसीकर, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, प्रदेश संपर्कप्रमुख उमेश कुलकर्णी, मराठवाडा प्रदेश संघटक धनंजय पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष नितीन शुक्ल, धाराशिव महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वाती कुलकर्णी, तुळजापूर तालुकाध्यक्ष अजित नाईक, नागेश नाईक, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मंजुषा नाईक आणि शैलेश देव उपस्थित होते.
*संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने बैठकीत पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या* :
*प्रवीण शिरसीकर – विश्वस्त*
*विद्या घटवाई – प्रदेश महिला आघाडी संपर्क प्रमुख (उत्तर महाराष्ट्र)*
*संजय देशमुख – प्रदेश कार्यकारिणी सदस्य*
*भाऊ जाखडी – प्रदेश उपाध्यक्ष*
*हेमंत इंदापुरकर – जिल्हाध्यक्ष, धाराशिव*
*प्रकाश जोशी – कार्याध्यक्ष, धाराशिव*
*श्रीकांत कुलकर्णी – पुरोहित आघाडी प्रमुख, धाराशिव*
*श्रीधर गोखले – सोलापूर जिल्हा संघटक*
*नागेश कुलकर्णी – सोलापूर शहराध्यक्ष*
*सुमित ठाकरे – जिल्हाध्यक्ष, संभाजीनगर*
*प्रफुल्ल भोपे – पुरोहित आघाडी प्रमुख, संभाजीनगर*
*प्रदीप सपनाईकर – बार्शी तालुकाध्यक्ष*

यानंतर ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदजी दवे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्या घटवाई यांनी केले. सदर बैठकीचे नियोजन तुळजापूर तालुकाध्यक्ष अजित नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांसाठी आयोजित सुरुची भोजनानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429

 


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!