आम्ही किडन्या विकून १०० कोटी देऊ, पण विश्वासघात करू नका”; उमरग्यातील शिवसैनिकांचे खासदार ओमराजेंना भावनिक पत्र


“आम्ही किडन्या विकून १०० कोटी देऊ, पण विश्वासघात करू नका”; उमरग्यातील शिवसैनिकांचे खासदार ओमराजेंना भावनिक पत्र

धाराशिव :
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि पक्षांतराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील शिवसैनिकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून एक भावनिक जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्रातील शब्दांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पत्रातून कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरील आपली निष्ठा आणि जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब व्यक्त केले आहे. “आम्ही आमच्या किडन्या विकून १०० कोटी रुपये गोळा करून देऊ, पण कोणत्याही परिस्थितीत विश्वासघात करू नका,” अशी भावनिक साद शिवसैनिकांनी घातली आहे.
पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता या पत्रातून स्पष्टपणे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी जनतेने दिलेल्या विश्वासाचा मान राखण्याचे आवाहन करत निष्ठा आणि विचारांशी तडजोड न करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना उमरग्यातील शिवसैनिकांनी घेतलेली ही भावनिक आणि आक्रमक भूमिका आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रानंतर धाराशिवच्या राजकारणात चर्चांना आणखी वेग आला असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

 


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!