खा. आष्टीकर, देशमुख यांच्या प्रतिमेला जोडेमारो; महाविकास आघाडी व उबाठातर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन:-


खा. आष्टीकर, देशमुख यांच्या प्रतिमेला जोडेमारो; महाविकास आघाडी व उबाठातर्फे प्रतिकात्मक पुतळा दहन:-

जि. यवतमाळ, ता. उमरखेड:दि. 23 जून :-उबाठा सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले हिंगोली तसेच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय देशमुख यांच्या निषेधार्थ सोमवारी उमरखेड येथे महाविकास आघाडी व उबाठा सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

स्थानिक संजय गांधी चौकात सकाळी ११ वाजता आयोजित आंदोलनात दोन्ही खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

या आंदोलनात उबाठा सेनेचे संपर्कप्रमुख अॅड. बळीराम मुटकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्करराव पंडागळे, तालुकाध्यक्ष स्वप्नील कनवाळे, विधानसभा समन्वयक राजेश खामनेकर, उपजिल्हा संघटक डॉ. अजय नरवाडे, तालुकाध्यक्ष सतीश नाईक, शहर प्रमुख संदीप ठाकरे, तालुका संपर्कप्रमुख निलेश जैन, शहर समन्वयक राजेश कवाने, युवा सेना जिल्हा समन्वयक संजय पळसकर, ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी शिंदे, दिगंबर मामा सूर्यवंशी, गजानन पवार, शिरीष शिंदे, संतोष जाधव, मुमताज खान, सुरेश कल्याणकर, सतीश कुबडे, यादव बचने, नागेश गोरेवाड, गजानन वानखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जनतेच्या विश्वासाला तडा दिल्याचा आरोप केला.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!