विरारमध्ये पार्किंगच्या वादातून १५ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला
विरार: विरार पूर्व येथील कारगील नगर परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून १५ वर्षीय मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






