बुलढाण्यात एसीबीची मोठी कारवाई; दिव्यांग मुलीच्या योजनेसाठी १२ हजारांची लाच घेताना संरक्षण अधिकारी रंगेहाथ पकडला
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी तुषार रमेश राणे यांना १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराच्या दिव्यांग मुलीला क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने एकूण २४ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जळगाव जामोद येथे एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तुषार रमेश राणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






