केतन अग्रवाल हत्याकांड: खटला उज्वल निकम लढवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
पुणे: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्यात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणे आणि विशेष सरकारी वकील नेमण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री यांनी दोन्ही मागण्या मान्य केल्याचे सांगितले.
यामुळे या बहुचर्चित प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू असून पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






