फुटलेल्या खासदारांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; ‘जिथे सापडतील तिथे जाब विचारा’


फुटलेल्या खासदारांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; ‘जिथे सापडतील तिथे जाब विचारा’

यवतमाळ :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे झालेल्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत शिवसैनिकांना, “हे गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे त्यांना जाब विचारा,” असे आवाहन केले.
सभेत बोलताना ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांचाही उल्लेख केला. बंडखोरीपूर्वी झालेल्या खासदारांच्या बैठकीचा संदर्भ देत ते म्हणाले, “दोन आठवड्यांपूर्वी मी बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुलीची सोयरीक जुळवायची असल्यामुळे व्हिडिओ कॉलवर उपस्थित राहतो, असे सांगितले होते.”
यावर उपरोधिक टोला लगावत ठाकरे म्हणाले, “मला काय माहीत, ते मुलीची सोयरीक जुळवत होते की स्वतःचीच सोयरीक जुळवत होते.”
ठाकरे यांनी बंडखोर खासदारांनी मतदारांचा आणि पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, जनतेसमोर जाऊन त्यांच्या भूमिकेचा जाब देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!