बसमध्ये चढण्याच्या घाईत प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू; अंबाजोगाई बसस्थानकातील घटना सीसीटीव्हीत कैद


बसमध्ये चढण्याच्या घाईत प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू; अंबाजोगाई बसस्थानकातील घटना सीसीटीव्हीत कैद

बीड :बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकात एसटी बसमध्ये चढण्याच्या घाईत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ जून रोजी घडली. ही संपूर्ण घटना बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धावत असताना त्याचा तोल गेला आणि तो बसजवळ पडला. या अपघातात त्याचा हात बसच्या चाकाखाली गेला, तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातादरम्यान संबंधित प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला असण्याचीही शक्यता आगार प्रमुखांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या घटनेनंतर एसटी प्रशासनाने प्रवाशांना बसमध्ये चढताना किंवा उतरताना धावपळ न करण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!