सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पात म्हाडा लॉटरीधारकांची फसवणूक; डाऊन पेमेंट घेऊनही फ्लॅट देण्यास नकार, वसईत मोठा गदारोळ


सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पात म्हाडा लॉटरीधारकांची फसवणूक; डाऊन पेमेंट घेऊनही फ्लॅट देण्यास नकार, वसईत मोठा गदारोळ

​वसई: येथे हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हाडा लॉटरी अंतर्गत ‘सुरक्षा स्मार्ट सिटी’ (Suraksha Smart City) प्रकल्पात फ्लॅट मिळालेल्या नागरिकांकडून लाखो रुपयांचे डाऊन पेमेंट वसूल करूनही आता त्यांना घरे देण्यास नकार दिला जात असल्याने वसईत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, अनेक मध्यमवर्गीय नागरिकांनी आपल्या कष्टाची जमापुंजी गोळा करून या प्रकल्पासाठी लाखो रुपयांचे डाऊन पेमेंट भरले होते. मात्र, म्हाडा लॉटरी लागून आणि पैशांचा भरणा करूनही सुरक्षा स्मार्ट सिटी प्रशासनाकडून हक्काचा फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विकासकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी थेट प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेत मोठा गदारोळ केला.
​”आम्ही आमच्या कष्टाचा पैसा विश्वासाने दिला, पण आता आम्हाला आमच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित ग्राहकांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे म्हाडाच्या लॉटरी यंत्रणेवर आणि विकासकांच्या पारदर्शकतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पीडितांनी या प्रकरणी तातडीने न्यायाची आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!