हिंदू महासभेच्या वतीने शिवराज्याभिषेक व्याख्यान व नूतन पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न ​पुणे: हिंदू महासभा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने


हिंदू महासभेच्या वतीने शिवराज्याभिषेक व्याख्यान व नूतन पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न

​पुणे: हिंदू महासभा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भव्य व्याख्यान व पदाधिकारी नियुक्ती समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल पवार उपस्थित होते.
​कार्यक्रमाची सुरुवात शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व विशद करणाऱ्या प्रेरणादायी व्याख्यानाने झाली. व्याख्याते आनंद दवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक नितीन शुक्ल यांनी हिंदू महासभेच्या कार्याची, ध्येयधोरणांची व आजवरच्या सामाजिक कामांची सविस्तर माहिती दिली.
​व्याख्यानानंतर प्रदेश अध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते शहर कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. यामध्ये समर्थ गायकवाड, संजय घोरपडे, अजित मुत्तिन, अजय कांबळे, जगन्नाथ कलशेट्टी व श्रीराम कोरडे, स्वरा जली कुलकर्णी यांच्यावर शहर कार्यकारिणीची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली.
​या प्रसंगी हिंदू महासभेचे अनेक शहर, जिल्हा व प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आदिती जोशी, विद्या घटवाई, तृप्ती तारे, मनोज तारे, हनुमंत कुलकर्णी, संजय देशमुख तसेच धाराशिव जिल्हा अध्यक्ष ऍड.विश्वजीत शिंदे आणि शैलेंद्र देव यांची विशेष उपस्थिती लाभली.
​कार्यक्रमाच्या शेवटी उमेश कुलकर्णी यांनी सर्व मान्यवर, पदाधिकारी व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. शिवराज्याभिषेकाच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारा व संघटनात्मक बांधणीला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!