चिंचवड: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘हिंदू साम्राज्य दिन’ संपन्न; शिवचरित्रावर प्रेरणादायी व्याख्यान


चिंचवड: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘हिंदू साम्राज्य दिन’ संपन्न; शिवचरित्रावर प्रेरणादायी व्याख्यान

चिंचवड: येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संत गाडगेबाबा शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ‘हिंदू साम्राज्य दिन’ अत्यंत उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगन्नाथ देवीकर आणि ज्येष्ठ स्वयंसेवक मधुकर बच्चे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली.
​त्यानंतर जगन्नाथ देवीकर यांनी शिवचरित्रावर आधारित अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी शस्त्रासोबतच शास्त्रालाही तितकेच महत्त्व दिले. आजच्या काळात प्रत्येक नागरिकाने ज्ञान, चारित्र्य, शिस्त, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा हे शिवरायांचे गुण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत, तरच आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीत आपले योगदान देऊ शकू.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना जागवली.
​कार्यक्रमाच्या शेवटी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवाजी!’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. “हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास जपूया आणि शिवरायांचे विचार आपल्या जीवनात रुजवूया,” असा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला. या प्रसंगी संघाचे स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!