चैतन्य महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी सौ. स्मिता कुलकर्णी
नाशिक : येथील चैतन्य महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षपदी सौ. स्मिता शेखर कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना सौ. स्मिता कुलकर्णी म्हणाल्या, “ही निवड माझ्यासाठी केवळ पद नसून एक मोठी जिम्मेदारी आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, बचत गटांचा विकास आणि ग्रामसंघाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा मी संकल्प करते.”
त्यांनी पुढे बोलताना सर्व महिला भगिनींचे आभार मानले आणि म्हणाल्या की, “आपल्या सर्वांच्या सहकार्याने, एकजुटीने आणि मार्गदर्शनाने आपण चैतन्य महिला ग्रामसंघाला नवीन उंचीवर नेऊ. प्रत्येक महिलेचा आवाज, सन्मान आणि विकास हेच माझे ध्येय राहील. सर्वांचा विश्वास आणि साथ हीच माझी खरी ताकद आहे.”
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









