सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठी दुर्घटना टळली


-सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा भीषण अपघात; एअरबॅगमुळे मोठी दुर्घटना टळली

सांगली :दी. 28 जून :-सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या चारचाकी वाहनाला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने वाहनातील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गाडगीळ हे स्वीय सहायक, अंगरक्षक, फोटोग्राफर आणि चालकासह उगार येथील कार्यक्रम आटोपून सांगलीकडे परतत होते. वडदी आणि कृष्णा घाट सर्व्हिस रोडदरम्यान अचानक एक दुचाकी कारसमोर आल्याने ती वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की कारमधील एअरबॅग तात्काळ उघडल्या. त्यामुळे आमदार गाडगीळ यांना केवळ किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षक नागेश भोकरे, फोटोग्राफर विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर हे सुखरूप बचावले.

दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला १०८ रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!