सांगली जिल्हाधिकारी यांचे मतदार गणणेस सहकार्य करण्याचे आवाहन :-


सांगली जिल्हाधिकारी यांचे मतदार गणणेस सहकार्य करण्याचे आवाहन :-

सांगली: दी.30 जून : -भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) घरोघरी जाऊन मतदारांकडून गणना फॉर्म भरून घेणार आहेत. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

जिल्ह्यातील एकूण 25.73 लाख मतदारांपैकी 22.38 लाख (86.98 टक्के) मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांचे मॅपिंग सुरू आहे. या विशेष मोहिमेसाठी 2,482 बीएलओंसह आवश्यक अधिकारी नियुक्त करण्यात आले असून मतदारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर व मतदार नोंदणी अधिकारी स्तरावर मदत कक्षही सुरू करण्यात आले आहेत.

तसेच घरोघरी येऊन मतदार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!