सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना:-


सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना:-

लातूर :दी. 30 जून :-लातूर बाजार समितीच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या चाकरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आवश्यक धान्याचा ट्रक रवाना करण्यात आला. गेल्या सलग २६ वर्षांपासून हा उपक्रम भक्तिभावाने राबविला जात असून, यावर्षीही मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या धान्य ट्रक रवाना कार्यक्रमाला माजी आमदार वैजनाथ शिंदे आणि सभापती जगदीश बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ट्रकला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

तसेच डॉ. कलवले, संजम, माने, जाधव, गायकवाड, गोरे, माळवदे, बोरुळे आणि देशमुख यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त ठोक महाराज नागपूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यांच्या कीर्तनाने चाकरवाडी येथे सप्ताहाची सांगता होत आहे.

या कार्यक्रमाला सर्व गावकरी, भजनी मंडळी, सर्वपक्षीय पदाधिकारी, गायक, वादक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता होत आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!