खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; वाकी परिसरात पुणे-नाशिक महामार्ग जलमय, वाहतूक ठप्प


खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; वाकी परिसरात पुणे-नाशिक महामार्ग जलमय, वाहतूक ठप्प

खेड : खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाकी परिसरातील पुणे-नाशिक महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहने पाण्यात अडकली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरून पाण्याचा वेगाने प्रवाह वाहत असल्याने वाहनचालकांना पुढे जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी
मो. 9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!