पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; वारकऱ्यांचे मोबाईल, रोकड लंपास


पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; वारकऱ्यांचे मोबाईल, रोकड लंपास
पुणे : प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यात काही समाजकंटकांनी गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वारकऱ्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून त्यामुळे वारकरी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हातचलाखीने मोबाईल व पाकिटे लंपास केली. काही वारकऱ्यांनी अंगावर खाज येणारी पावडर टाकून लक्ष विचलित केल्यानंतर चोरी झाल्याचाही आरोप केला आहे. या प्रकारामुळे अनेक वारकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून वारीच्या पवित्र वातावरणाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित तक्रारींची नोंद घेण्यास सुरुवात केली असून संशयितांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. पालखी मार्गावर बंदोबस्त वाढविणे, सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करणे तसेच वारकऱ्यांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, चोरट्यांवर कठोर कारवाई करावी आणि वारकऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वारकरी बांधवांकडून होत आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!