अंधेरी स्थानकावर वाद; मराठीत बोलण्याच्या मागणीनंतर प्रवाशाला तासभर डांबून ठेवल्याचा आरोप


अंधेरी स्थानकावर वाद; मराठीत बोलण्याच्या मागणीनंतर प्रवाशाला तासभर डांबून ठेवल्याचा आरोप

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठीत संवाद साधण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिकीट तपासणी (टीसी) अधिकाऱ्यांकडे मराठीत बोलण्याची मागणी करणाऱ्या एका प्रवाशाला सुमारे एक तास एका खोलीत बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाने टीसीकडे मराठीत बोलण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या वादानंतर संबंधित प्रवाशाला एका खोलीत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशाविरोधातच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. संबंधित टीसी अमराठी असल्याचाही दावा करण्यात येत आहे.

या घटनेनंतर मराठी एकीकरण समितीने तीव्र निषेध व्यक्त करत रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत रेल्वे प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, पुढील तपास आणि प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!